या नाटकातले काही मला आवडलेले संवाद
"....मला चिरतारूण्याचा आशिर्वाद तात्याराव सावरकरांनी दिलाय. तात्याराव सावरकर - सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांना हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतिंनी शिष्यत्व पत्करावा इतकी बुद्धिची प्रगल्भता
या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजे तात्याराव सावरकर ...."
"... तात्यारावांचे शब्द ते, शिलालेखच
जणू. तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद ..."
"... भवानी तलवार लोखंडाची असली हे जरी सत्य असला तरी प्रत्येक लोखंडाचा तुकडा भवानी तलवार असू शकत नाही..."
"... महाराजानी स्पर्श केला म्हणून तलावारीची भवानी झाली. तलावारीच्या पात्यापेक्षा मूठ जास्त महत्वाची. मूठीवरच्या पकडीमधे जिद्द असेल तर तलावारीला धार येते ..."
"... जगाला हिंसेपेक्षा अहिंसाच जास्त आवश्यक आहे. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण, स्वहित नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. स्वतःच्या अस्तित्त्व रक्षणासाठी धडपडणे याची व्याख्या हिंसा, असा करणारी अहिंसाच म्हणजेच स्वहिंसा नव्हे काय? ..."
सम्पूर्ण नाटक बघा. भाग १ ते १४
भाग ०१भाग ०२भाग ०३भाग ०४भाग ०५भाग ०६भाग ०७भाग ०८भाग ०९भाग १०भाग ११भाग १२भाग १३भाग १४