Saturday, February 21, 2009

जगाच्या पाठीवर

आज जगाच्या पाठीवर हा चित्रपट बघण्यात आला. त्यातला एक धागा सुखाचा हे गीत बघितलं. जुन्या गाण्यांना खूप अर्थ होता.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे 
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे 
|| ध्रु ||
पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक , तीन प्रवेशांचे 
|| १ ||
मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची 
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे ! 
|| २ ||
या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकऱ्याचे 
|| ३ ||